देव दगडात नाही माणसात आहे…………………. This is True Incident……


मी रेल्वे स्टेशन बाहेर बसलो होतो, ट्रेनची वाट बघत. वेळ रात्रीची १ वाजून १५ मिनिटे. ४:१२ ची ट्रेन होती. जवळपास दोन तास काढायचे होते. भूक भयानक लागली होती. काहीतरी खावून तर सोडाच, पाणी पिऊन देखील ७-८ तास उलटले होते. पण करणार काय!! पाकिटाचा तर नेहमीचा दुष्काळ. पण सांगायचा तरी कुणाला… भूकबळीपेक्षा मुकबळी जाणार होता. माझ्या सभोवताली गर्दी असूनही एकटा पडलो होतो. विचार करत होतो अविचारी वर्तमानाचा, विचारहीन भूतकाळाचा, अन बिचार्या भविष्यकाळाचा…घड्याळाचे काटे सुद्धा संथगतीने चालत होते. जीव असूनदेखील प्रेत झालं होता शरीराचं; पण म्हणतात न, ‘उसके घर में देर है, अंधेर नाही’. त्याचीच जणू प्रचीती आली.

समोर एक भिक्षुसम मनुष्य येवून उभा राहिला. का कुणास ठावूक, पण त्याच्याकडे चटकन नजर गेली. कुरळे केस, दाढीच जंगल झालेला, मळकट काळासा चेहरा, अंगावरच्या शर्टचा आणि पाण्याचा जणू काही मिलाप झालेलाच नाही. पायात मातकट रंगाची फाटकी Pant. हातातील वाफाळलेल्या चहाचे गरमागरम झुरके घेत कसलं तरी गंभीर विचार करत उभा होता.मी आपलं सहजच निरीक्षण करत होतो. पण, अचानक त्याची नजर चटकन माझ्या चेहऱ्यावर गेली, ते पाहून मी जरा दचकलोच आणि मी माझी नजर दुसरीकडे फिरवली. पैशांची त्यावेळेला खूपच गरज होती. जवळपास १५-२० मिनिटे नजरेचा लंपडाव चालूच होता. मी मात्र बोलू कि नको, बोलू तर काय बोलू? शेवटी त्याच्याच सहनशीलतेचा अंत झाला, तो जवळ आला आणि त्याने विचारले, “काय रे? का बघतो आहेस असा? काही मदत हवी का?” आता काय सांगायचं त्याला? मी सांगितलं कि ट्रेनची वाट पाहेत बसलोय. पैसे नाही आहेत खिशात, रात्री जेवलो सुद्धा नाही आहे. भरपूर भूक लागली आहे. तो म्हणाला, “अरे एवढंच ना? थांब मी आलो एका मिनिटात; तो मागे गेला आणि एक वाफाळलेला चहाच कप माझ्या हातावर ठेवला. मी अवाक होऊन बघतच राहिलो. तो म्हणाला, “अरे बघतोस काय? Just have it before it get cold.” आता तर मी चक्कर येवून कोसळायाचाच काय तो बाकी राहिलो होतो. मला रेडा वेद म्हणतो यापेक्षा हा फकीर एवढं अस्खलित इंग्रजी बोलतो याचंच अप्रूप वाटलं. मी निमुटपणे चहाचा घोट घेतला. त्याने माझं घर, शिक्षण काम-धंदा इ. बद्दल चौकशी केली. मी शेवटी न राहवून विचारलं कि तुम्ही एवढं चं इंग्रजी बोलता मग हे असे कपडे का? याचं त्याने जे उत्तर दिलं, त्यला मी माझ्या मनात उत्तर धृवा पेक्षा वरच स्थान दिलं. तो म्हणाला……..

“खरंतर I am graduate person with arts. पण आता मी ज्या अवस्थेत आहे, तो नशिबाचा-दैवाचाच एक खेळ म्हणायचा. आम्ही एकूण चार भावंडं, तीन आम्ही भाऊ आणि एक बहिण. वडील लहान असतानाच वारले. त्यांचा तर आवाजदेखील आठवत नाही मला. मग आम्हाल आईने सांभाळलं. मी सगळ्यात मोठा, त्यामुळे प्रथम करता मीच. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरी केली. पण नोकरीत काही माझं मन रमेना.शेवटी मग एक टेलरिंगच दुकान चालू केलं. मोठ्या मेहनतीने कर्ज वगैरे काढून मी तो नावारूपाला आणला. त्याचा विस्तार नंतर इतर दोन व्यवसायांमध्ये झाला आणि ते म्हणजे मशीन रेपैरिंग आणि म्याचींग सेंटर. जरा कुठे जम बसतोय न बसतोय तोच बहिणीचं लग्न येऊन ठेपलं. आता लग्न म्हणजे लाखांत पैशांची उधळण. पुन्हा कर्जबाजारी झालो. आतड्यांना पीळ पाडून कसबसं कर्ज फेडलं. पण सगळ्यात दुख:द बाब म्हणजे लग्नानंतरच्या पहिल्या आठवड्यात बहिण दगावली. आणि या धक्याने आई सुद्धा पंधरवड्यात वारली.

आपणच जर असे खचलो तर धाकट्या भावांनी काय करायचं, शेवटी कशीबशी मनाला उभारणी देऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली. मशीन रीपैरिंग आणि म्याचींग सेंटर चा कार्यभाग भावांच्या हाती सोपवला. मी आपलं शिवणकाम चालूच ठेवलं. आणि आता वेळ होती नव्या कुर्हाडीच्या कोसळण्याची. दोन्ही लहान भावांनी टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेवून आणि उलटसुलट सह्या घेवून तिन्ही व्यवसाय, माझं घर आणि इतर संपत्ती त्यांनी आपल्या नावे करून घेतली. माझं स्वत:चं कुणीच उरलं नाही. नाईलाजास्तव मी माझं म्हणजेच त्यावेळचं भावांच घर सोडलं. कारण त्यावेळेला माझी पत्नी पोटातल्या मुलासकट मला सोडून देवाघरी गेली. सांग मला हे सहन करायचं तरी कसं? जगायचं तर का? आणि कुणासाठी? काही दिवसातच आयुष्य होत्याचं नव्हतं झाला होतं. आता राहायला फुटपाथच होता. तुला खरं नाही वाटणार पण १९९७ पासून चपाती-भाजी, भात आमटी असं एकावेळी धड मी जेवलेलो देखील नाही. पोटाची आतडी मारून दिवसभर काय मिळेल ते खावून , गेली तेरा वर्ष मी दिवस काढतोय. आज आता इथे आहे, उद्या कुठे असेन पत्ता नाही. आता जीव आहे तोपर्यंत जसं जाईल तसा आयुष्य जगायचं. म्हणतात ना, मागून तर मरणसुद्धा मिळत नाही. देवाने प्रत्येक गोष्टीसाठी एवढ्या खस्ता खायला लावल्या निदान मरण तरी सहजासहजी द्यावं, पण तेसुद्धा नाही. “Now what do I do my boy, what can I do?”

हातातला कप कधी रिकामी झाला ते कळलंच नाही. त्याच्या त्या चेहऱ्याकडे मी अवाक होवून बघतच राहिलो. तोंडातून तर शब्द फुटत नव्हते. मनात एकक्षण वाटलं हा मनुष्य प्राणी नक्कीच नसणार कारण एखाद्या माणसाला शक्यच नाही इतकं सगळं सहन करणं. त्याच्यासमोर जणू साष्टांग नमस्कार घालावं असं वाटलं होतं मला. मी तर अशा परिस्थितीत जगूच शकलो नसतो. त्यात घड्याळाकडे लक्ष्य गेलं, बघतो तर पावणे चार वाजले होते. वेळ कुठे, कधी आणी कसा गेलं ते कळलंच नाही. मला तेथून निघणं आवश्यक होतं. मी अक्षरश: त्या माणसासमोर दोन्ही हात जोडले आणी म्हणालो , “हे सगळं तुम्ही कसं सहन केलंत तुमच्याच जीवाला माहित. मी तर कधीच सहन करू शकलो नसतो.” त्याने माझे जोडलेले हात खाली घेतले आणी म्हणाला, “अहो असं काय करताय? खूप शिका, आनंदी राहा, मजेत आयुष्य जगा. मी तुमच्या काही कामी येवू शकलो असतो तर मला अजून बरं वाटलं असतं.” ते ऐकून मी अक्षरश: ओशाळलो, कारण त्यावेळी मी त्याचे आभार मानावेत तेवढं कमीच होते.

मी अतिशय जड मनाने त्यांचा निरोप घेत होतो, तेवढ्यात त्यांनी खिशातून १० रूपयांची नोट काढून माझ्या वरच्या खिशात टाकली. मी ती परत काढायला गेलो तर त्यांनी माझा खिसा दाबून धरला व म्हणाले, “एक वडीलधारी व्यक्ती म्हणून माझी काही इज्जत करत असाल तर ही नोट ठेवा.” मला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. खरंच तो मनुष्य नव्हता तर देवांपेक्षा माझ्यासाठी श्रेष्ठ बनला. मी म्हटलं ” मग तुम्ही पण माझी एक गोष्ट मान्य केलीच पाहिजे.” मी माझ्या खिशाला लावलेलं पेन काढून त्यांच्या खिशाला लावलं, मी म्हणालो, “Please, एवढी माझी आठवण ठेवा.” त्याने ते हसत हसत स्वीकारलं.

स्टेशनच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल मनातल्या विचारांचं जाळं अधिकच घट्ट करत होतं. “देव दगडात नाही माणसात आहे, ते त्यावेळी पटलं.” त्याच्या त्या दानशूर व्यक्तिमत्त्वाच्या उंची समोर मी स्वत:ला फारच ठेंगणा वाटू लागलो. ४:१२ ला ट्रेन आली. मी ट्रेन मध्ये चढलो, या विचारांमध्ये झोप कधी लागली कळलंच नाही. नंतर ठाणे स्टेशनला उतरून परत आपल्या पोकळ प्रतिष्ठेच्या खोट्या विश्वात अत्यंत दुखी मनाने जाताना पावलं अधिकच जड झाली होती……….. त्या महान आत्म्याला साष्टांग दंडवत !!!!

 

Advertisements

About सचिन पवार

आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोय, वाहणारे अश्रु येतात जिथुन मी तो पाट शोधतोय.. मला व्यापलं आहे जीवनाने अन,मी माझी जागा शोधतोय, नात्यांच्या या रेशिम बंधातुन मी माझा धागा शोधतोय... मनात जे भरुन आहेत कधीचे मी त्या श्वासांना शोधतोय, जगण्याची जे उर्मी देतात मी त्या ध्यासांना शोधतोय.... खरं सांगायचं तर मी माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय....
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s