_____सावली_____


Image

माझं कोणीच नव्हतं या जगात…
मात्र होता एकच विश्वास, तेवढी सावली तरी माझी आहे.
सर्व काही तीच आहे, कारण पावलोपावली तीच माझी आहे
ऊन, वारा, पाउस असो, सदानकदा ती माझ्या बरोबर आहे.
माझ्या अंतवेळी देखील ती माझ्याबरोबरच येईल.

माझा विश्वास होता कि ती प्रकाशात माझ्याबरोबर राहते.
कदचीत अंधाराला ती घाबरत असावी म्हणून दूर जाते.
सहजच म्हटलं तिला “कि तू मला सोडून जाऊ नकोस”.

काय उत्तर द्यावं तिने…………..

वेड्या भलत्या भ्रमात राहू नकोस.
प्रकाश माझा आहे, आणि त्यासाठी तू मला हवा आहेस….
कारण प्रकाश आणि माझ्या मिलानातील तूच एक दुवा आहेस….

उत्तर तिचं ऐकून वाचा माझी गप्प झाली.
हृदयातील मित्वाची स्पंदन हळूहळू ठप्प झाली.

जे माझं वाटत होतं, ते पण आता शून्य झालंय….
मी देखील माझं नाही हे पण मी मान्य केलंय…….

Advertisements

About सचिन पवार

आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोय, वाहणारे अश्रु येतात जिथुन मी तो पाट शोधतोय.. मला व्यापलं आहे जीवनाने अन,मी माझी जागा शोधतोय, नात्यांच्या या रेशिम बंधातुन मी माझा धागा शोधतोय... मनात जे भरुन आहेत कधीचे मी त्या श्वासांना शोधतोय, जगण्याची जे उर्मी देतात मी त्या ध्यासांना शोधतोय.... खरं सांगायचं तर मी माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय....
This entry was posted in कविता and tagged . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s