पोलिसांची इमेज


आज मी आपल्याशी बोलणार आहे, पोलीस खात्याविषयी. ‘सदरक्षणाय खलनिग्रहाय’ हे या खात्याचे ब्रीदवाक्य॰ याचा अर्थ, सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी॰ आता बरेच जन म्हणतील, कि या शब्दांचा क्रम जरा चुकलाय, ते ‘खलरक्षणाय सद्निग्रहाय’ असा असायला हवं होतं. पण मित्रांनो, पोलीस खातं वाईट नाही हो, तर यात जे काही ‘खातेदार’ आहेत ते वाईट आहेत. त्यांच्यामुळे अतिशय पवित्र असं हे सेवाक्षेत्र उगीचच बदनाम होतंय, असं मला वाटतं॰

आज पोलिस खात्याची जी काही अवस्था (खरंतर दुरवस्थाच॰॰!) आहे, त्याला कारण आहे याला लागलेली भ्रष्टाचाराची कीड॰ पोलिस दलात अनेक विभाग आहेत उदा. कायदा आणि सुव्यवस्था, अंमली-पदार्थविरोधी दल, दहशतवाद विरोधी पथक गुन्हे शाखा, ‌‍‌‍‍‍‍‍‍‌‌Anti-Curruption… आणि हो, एक महत्वाचं एक दल राहिलंच, वाहतूक शाखा. ट्राफिक पोलिस हे यामध्ये सगळ्यात जास्त (कु) प्रसिद्ध दल. यांचे ‘व्यवहार’ तुमच्या आमच्या समोरच चालतात.

दहशतवादी पथकांची कामगिरी २६/११ ला आपण बघितलीच. आज बघितलं तर कुंपणाने शेत खाल्ल्यासारखी पोलिस दलाची अवस्था आहे. पद आणि बदल्यांच्या राजकारणात पोलिस दलाची प्रतिष्ठा रसातळाला गेली आहे. लोकांच्या मनात पोलीसांबद्दलचा आदर नामशेष होतोय. पैसे चारले कि पदोन्नती मिळते किंवा गुन्हे होतात, गुन्ह्यांची नोंद होत नाही, नोंद झाली तरी सहीसलामत सुटका होते.

पोलिस कर्मचारी रस्त्यावर दररोज ५०-१०० रुपयांना विकला जाताना दिसतो. स्वत: पोलिसांनाच नियम आणि कायद्याचं भान नाही, कित्येक पोलिस हेल्मेट घालत नाहीत, स्वत:च्या गाडयांवर पोलिसचं स्टीकर लावतात, जे बेकायदेशीर आहे, सिग्नल पाळत नाहीत, पैसे खातात, राजकारण्यांसमोर मानच काय तर पाठीचा कणाही उतरवून ठेवतात. त्यात भरीस भर म्हणजे इतकं करूनही त्याचं त्यांना काहीच वाटत नाही, याचं दु:ख होतं.

माझी सर्व पोलिस बांधवांना विनंती आहे कि, आपल्या खात्यात सहभागी होनाजी शपथ तुम्ही घेता टी आठवा. पैसा किंवा दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे या खात्याची सेवा करा, याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही. मला विश्वास आहे कि जनता जनार्दन नक्कीच तुमच्या पाठीशी असेल. त्यासाठी माझ्या शुभेच्छा!!

Advertisements

About सचिन पवार

आयुष्याच्या या वाटेवर मी माझी वाट शोधतोय, वाहणारे अश्रु येतात जिथुन मी तो पाट शोधतोय.. मला व्यापलं आहे जीवनाने अन,मी माझी जागा शोधतोय, नात्यांच्या या रेशिम बंधातुन मी माझा धागा शोधतोय... मनात जे भरुन आहेत कधीचे मी त्या श्वासांना शोधतोय, जगण्याची जे उर्मी देतात मी त्या ध्यासांना शोधतोय.... खरं सांगायचं तर मी माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय....
This entry was posted in कथा and tagged . Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s